स्कोडा कुशाक, स्लाविया 'या' तारखेपासून होणार महाग

By Ninad Vijayrao Deshmukh
Dec 22, 2024

Hindustan Times
Marathi

नवीन वर्षापासून भारतात स्कोडा कारच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा कंपनीने केली आहे. 

या निर्णयामुळे भारतातील कायलॅक वगळता सर्व स्कोडा कार ३  टक्क्यांपर्यंत महाग होणार आहेत. 

ही दरवाढ इतर वाहन निर्मात्यांच्या अनुषंगाने करण्यात आली आहे, ज्यांनी आपापल्या मॉडेल्सच्या किंमतीत वाढ जाहीर केली आहे. 

या निर्णयामुळे स्कोडा किंमत वाढीची घोषणा करणाऱ्या कार कंपन्यांच्या यादीत सामील झालेली आणखी एक कार कंपनी झाली आहे.  

स्कोडा इंडियाच्या किलक, स्लाव्हिया, कुशाक, कोडियाक आणि सुपर्ब हे सहा मॉडेल्स भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 

काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आलेल्या किलक या कारला या दरवाढीतून वगळण्यात आले आहे.  

स्कोडाच्या इतर कार सध्या मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे.  

कच्च्या मालाच्या वाढत्या किमती व वाढलेला उत्पादन खर्च ही दरवाढीचे प्रमुख कारण असल्याचं  स्कोडानं स्पष्ट केलं आहे. 

या दरवाढीचा स्कोडा कारचा विक्री काय परिणाम होणार? हे पाहावे लागणार आहे.  

झणझणीत मिरचीचा ठेचा कसा बनवायचा?