जास्त आवळा खाण्याचे साइड इफेक्ट्स!
By
Aiman Jahangir Desai
Dec 18, 2024
Hindustan Times
Marathi
आवळा हे सुपरफूड म्हणून ओळखले जाते जे व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे.
हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे पण त्याचे जास्त सेवन केल्याने काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात.
आवळा जास्त खाल्ल्याने पोटात गॅस, अपचन किंवा जुलाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
आवळा आंबट असून तो जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील ॲसिडचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे ॲसिडिटी आणि जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते.
आवळ्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते आणि जास्त पोटॅशियम किडनीच्या कार्यावर परिणाम करू शकते.
आवळा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतो पण जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी जास्त प्रमाणात कमी होऊ शकते.
काही लोकांना आवळ्याची ऍलर्जी देखील असू शकते, ज्यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, खाज येणे आणि सूज येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
आयफोनपेक्षा सॅमसंगचा 'हा' फोन भारी!
HT Tech
पुढील स्टोरी क्लिक करा