मुलांना क्रीम बिस्किटं देण्याचे दुष्परिणाम 

Pexels

By Hiral Shriram Gawande
Jun 15, 2024

Hindustan Times
Marathi

सहसा मुलांना क्रीम बिस्किटं खायला आवडतात.  अनेक मोठ्यांना देखील हे खायला आवडते. कारण यातील क्रीम नेहमीच्या बिस्किटांच्या तुलनेत जास्त गोड असते. या क्रीमची चव चांगली असली तरी मुलांनी जास्त खाल्ल्यास अनेक आजार होऊ शकतात.

Pexels

क्रीम बिस्किटं खाणारी मुले लवकरच लठ्ठ होतील, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आणि जे मुले भरपूर क्रीम बिस्किटे खातात त्यांची स्मरणशक्ती कमी होते. या क्रीममध्ये फ्रक्टोज कॉर्न सिरप आणि तेल जास्त असते. हे दोन्ही आरोग्यासाठी हानिकारक आहेत.

Pexels

पोषणतज्ज्ञांच्या मते निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना क्रीम बिस्किटे देणे टाळावे. ही क्रीम बिस्किटे प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या यादीत आहेत. अशा पदार्थांचा मेंदू आणि शरीरावर खोलवर परिणाम होतो. त्यामुळे मुलांना क्रीम बिस्किटे देणे बंद करा.

Pexels

क्रीम बिस्किटे सुमारे १०० वर्षांपासून बनविली जात आहेत. मैदा, पाम तेल किंवा मोहरीचे तेल, कोको पावडर, हाय फ्रक्टोज कॉर्न सिरप, बेकिंग सोडा, कॉर्नस्टार्च, व्हॅनिलिन, चॉकलेट, सोया, लेसीथिन आणि मीठ हे बिस्किटे बनवण्यासाठी वापरतात. 

Pexels

क्रीम बिस्किटांमध्ये साखर आणि मोहरीचे तेल महत्त्वाचे आहे. हे जास्त प्रमाणात खाल्ल्याने मुलांच्या आरोग्याला हानी पोहोचते. १० क्रीम बिस्किटे खाल्ल्याने मुलाच्या शरीरात ७०० कॅलरीज वाढतील. यामुळे ते लठ्ठ होतात.

Pexels

हृदयविकार, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, किडनी विकार, मेटाबॉलिक सिंड्रोम, हृदयविकाराचा झटका इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. उच्च फ्रक्टोज साखर आणि मोहरीच्या तेलाने समृद्ध असलेली ही क्रीम बिस्किटे मुलांना देणे बंद केले पाहिजे.

Pexels

मेंदूचे कार्य बदलते. मुले काय वाचतात ते आठवत नाही. हृदयाच्या आरोग्यावरही याचा खोल परिणाम होतो. प्रक्रिया केलेली साखर आणि तेल दोन्ही रक्तामध्ये एकत्र होऊन गंभीर प्रतिक्रिया निर्माण होतात. त्यामुळे हृदयात जळजळ होते. 

Pexels

मुलांना पोटात जंत होण्याची शक्यता कमी असते.

Pexels

स्वयंपाकासाठी वापरू नका हे तेल

pixabay