१८ जानेवारीपासून या तीन राशींवर लक्ष्मीची कृपा, धनवर्षा होणार  

By Rohit Bibhishan Jetnavare
Jan 17, 2024

Hindustan Times
Marathi

संपत्ती, सुख, समृद्धीसाठी जबाबदार असलेला ग्रह १८ जानेवारीला धनु राशीत प्रवेश करणार आहे. २०२४ चे हे पहिलेच शुक्र संक्रमण असेल.

ज्योतिषांनी सांगितल्यानुसार, या शुक्र संक्रमण काळात तीन राशींवर लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे. 

मेष- शुक्र संक्रमणामुळे राशीच्या लोकांना आर्थिक दृष्ट्या फायदा होईल. बँक बॅलेन्स वाढेल आणि नोकरी-व्यवसायात प्रगती होईल.

तसेच, भावंडांशी संबंध चांगले राहतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील, कुटुंबांना चांगली बातमी मिळेल. आरोग्य चांगले राहील.

मिथून- नोकरी-व्यवसायासाठी शुभ काळ राहील. गुंतवणूक करणाऱ्यांना दीर्घकाळ चांगले परिणाम मिळत राहतील. वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता.

नोकरीत असलेल्यांना बढती मिळू शकते. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची एकाग्रता अधिक वाढू शकते.

धनु- नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी काळ शुभ आहे. चांगली नोकरीची ऑफर मिळू शकते. घरात समृद्धी राहील.

समाजात मान-सन्मान वाढेल. कुठेतरी अडकलेला पैसा परत मिळू शकेल. पालकांच्या पाठिंब्याने तुम्ही काहीतरी मोठे साध्य कराल.

वजन कमी करण्यासाठी आहारात घ्या हे शाकाहारी पदार्थ

Photo Credits: Unsplash