शुभमन गिलनं गाठला विक्रमी टप्पा!

By Ashwjeet Rajendra Jagtap
Jan 04, 2024

Hindustan Times
Marathi

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊन येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. 

या सामन्यात भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. 

शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमधील १००० धावांचा टप्पा गाठला आहे.

दरम्यान, २० कसोटी सामन्यातील ३६ डावात त्याने ही कामगिरी करून दाखवली आहे.

याआधी शुभमन गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या होत्या.

कसोटी क्रिकेटमध्ये त्याने दोन शतक आणि चार अर्धशतके झळकावली आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत ४४ सामन्यांच्या ४४ डावांमध्ये २ हजार २७१ धावा केल्या आहेत. 

एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ६ शतक आणि १३ अर्धशतकांची नोंद आहे, ज्यात एका द्विशतकाचा समावेश आहे.

१०८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेल्या फोनवर मोठी सूट