श्रिया पिळगांवकर दत्तक मुलगी? सत्य काय? वाचा...

All Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
Apr 19, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी चित्रपटसृष्टीत कलाकार वडील-मुलगा, आई-मुलगा किंवा मुलगी अशा अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. 

यातील एक सुप्रसिद्ध बाप-मुलीची जोडी म्हणजे सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर.

‘एकुलती एक’ या चित्रपटातून सचिन पिळगांवकर यांनी आपल्या मुलीला अभिनय क्षेत्रात आणले. 

त्यानंतर मात्र, श्रियाने  आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपट, वेब सीरिज उत्तम भूमिका साकारल्या आहेत.

एकीकडे तिच्या अभिनयाची चर्चा होत असताना, दुसरीकडे मात्र तिच्या बद्दल अनेक अफवा देखील पसरत आहेत.

गेली अनेक वर्ष श्रिया पिळगांवकर ही सचिन आणि सुप्रिया यांची दत्तक मुलगी असल्याची चर्चा होत आहे.

अनेकांना असे वाटते की, श्रिया पिळगावकर ही दत्तक मुलगी आहे. मात्र, ही केवळ अफवा आहे. 

श्रिया पिळगावकर ही सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची स्वतःची पोटची मुलगी आहे. 

श्रिया लहान असताना सचिन आणि सुप्रिया यांनी करिष्मा नावाच्या एका मुलीचा सांभाळ केला होता.

वयाच्या १५व्या वर्षी अक्षयच्या लेकाने सोडले घर