‘या’ दिवशी घरात आणा बाळकृष्णाची मूर्ती!

By Harshada Bhirvandekar
Aug 24, 2024

Hindustan Times
Marathi

बाळ गोपाळाची मूर्ती घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे घरात नेहमी सुख समृद्धी येते.  

ज्योतिष शास्त्रानुसार असे काही विशेष दिवस आहेत, ज्यावेळी तुम्ही बाळकृष्णाची नवीन मूर्ती घरी आणू शकता.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, बाळकृष्णाची नवी मूर्ती केव्हा घरी आणणे शुभ असते...  

जर तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची नवीन मूर्ती घरी आणली, तर ती तुमच्यासाठी फलदायी ठरू शकते.

यावर्षी म्हणजेच २०२४ मध्ये कृष्ण जन्माष्टमी २६ ऑगस्ट साजरी होणार आहे. 

या दिवशी म्हणजेच जन्माष्टमीच्या दिवशी नवीन बाळकृष्णाची मूर्ती घरात आणून, तिची पूजा करणे शुभ मानले जाते.  

भाद्रपद महिन्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही बाळकृष्णची नवी मूर्ती घरी आणू शकता. 

एकादशीचा दिवस हा भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी बाळकृष्णाची नवी मूर्ती घरी आणणे शुभ मानले जाते.  

पौर्णिमेच्या दिवशी बाळगोपाळाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात.

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!