श्रद्धा कपूरचे 'हे' ८ चित्रपट ठरलेत सुपर फ्लॉप!

By Harshada Bhirvandekar
Aug 21, 2024

Hindustan Times
Marathi

श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधल्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा अभिनय सगळ्यांनाच आवडतो.

'स्त्री २' या चित्रपटामुळे श्रद्धा कपूर सध्या प्रचंड चर्चेत आहे. मात्र, या आधी तिचे काही चित्रपट फ्लॉप ठरले आहेत.

श्रद्धा कपूर हिने 'तीन पत्ती' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. तिचा  हा चित्रपट फ्लॉप ठरला होता.

श्रद्धा कपूर हिचा दुसरा चित्रपट 'लव्ह का द एंड' हा चित्रपट मैत्री, प्रेम आणि रोमान्सवर आधारित होता, जो फ्लॉप ठरला.

म्युझिक बँडवर आधारित श्रद्धाचा 'रॉक ऑन' हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. यात अर्जुन रामपाल आणि फरहान अख्तर देखील होते.

'ओके जानू' हा चित्रपट रिलेशनशिपवर आधारित होता. यात आदित्य रॉय कपूर देखील मुख्य भूमिकेत होता.

अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा 'हाफ गर्ल फ्रेंड' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला होता.

डॉन दाऊदची बहीण हसीना पारकरच्या बायोपिकमध्ये श्रद्धा कपूर झळकली होती. हा चित्रपट फ्लॉप झालेला.

'स्ट्रीट डान्सर ३डी' हा चित्रपट डान्सवर आधारित होता, जो फ्लॉप ठरला.

श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ यांचा 'बागी ३' हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नव्हता.

बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रेया बुगडे पोहोचली वर्षा बंगल्यावर