श्रद्धा कपूरला कोणत्या चित्रपटासाठी मिळालंय सर्वाधिक मानधन?
By
Harshada Bhirvandekar
Aug 14, 2024
Hindustan Times
Marathi
श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी 'स्त्री २' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.
श्रद्धाला याआधी रिलीज झालेल्या एका चित्रपटासाठी ‘स्त्री २’पेक्षा जास्त फी मिळाली होती.
श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिची जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे.
‘स्त्री २’ या चित्रपटासाठी श्रद्धा कपूरला ५ कोटी रुपये मानधन मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
पण, याआधी तिने 'तू झुठी मैं मक्कार' या चित्रपटासाठी यापेक्षा जास्त फी घेतली होती.
'तू झुठी मैं मक्कार' हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूर दिसला होता.
या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
मीडिया रिपोर्टनुसार, 'तू झुठी मैं मक्कार' या चित्रपटासाठी श्रद्धा कपूरने ७ कोटी रुपये घेतले होते.
बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये श्रद्धा कपूरचा समावेश होतो.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा