साडी आणि हिल्समध्ये फाईट करतेय ‘शिवा’!

By Harshada Bhirvandekar
Jun 26, 2024

Hindustan Times
Marathi

'शिवा' या नव्या मराठी मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या हृदयात घर केले आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडताना दिसत आहे.  

शिवाची स्टाईल घराघरांत प्रसिद्ध झाली आहे. मग, ती शिवाचा शर्ट-पॅन्ट आणि बॉयकट असो.. किंवा लग्नानंतरचा साडीचा लूक... 

आता काय तर शिवाने साडी नेसून केलेल्या फाईट सीनची सर्वत्र चर्चा होतं आहे. शिवा म्हणजेच पूर्वा कौशिकने साडी नेसून फाईट सीन शूट करण्याचा अनुभव व्यक्त केला आहे.

साडीमध्ये फाईट सीन करण्याचा अनुभव खूप कमाल होता. मी आयुष्यात पूर्वा म्हणून हे करेन असं मला कधीच वाटलं नव्हत, असं ती म्हणाली. 

पण, या मालिकेच्या निमित्ताने मला हे सर्व करायला मिळालं याबद्दल खरंच आनंद आहे, असे पूर्वा म्हणाली.  

साडीमध्ये फाईट सीन करायची चर्चा सुरू झाली, तेव्हा थोडं दडपण आलं होतं, असं पूर्वा कौशिक म्हणाली.

कुठच्याही कलाकाराच्या आयुष्यात असा क्षण त्याच्या अभिनयाच्या प्रवासात माईलस्टोन असतो आणि मला तो क्षण अनुभवायला मिळाला. 

फाईट सीनच शूटिंग होतं असताना, फाईट मास्टरचे मार्गदर्शन होतेच आणि सर्व गरजेची सावधगिरी घेऊनच आम्ही सगळं शूट करत होतो. 

मला आधी वाटलं होतं की, मी हे साडीत आणि हिल्सच्या सॅण्डलवर हे पेलवू शकेन का? पण, शिवा नव्याने उभी राहायचा प्रयत्न करत आहे.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान