छम्मक छल्लो! शहनाज गिलचा कातिलाना अंदाज 

By Harshada Bhirvandekar
Apr 24, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल सध्या सगळ्यांचीच फॅशन आयकॉन बनत चालली आहे. 

काळाबरोबर तिने तिच्या फॅशन गोल्समध्येही बरेच बदल केले आहेत आणि आता ती एक स्टाईल आयकॉन बनली आहे.

शहनाज गिल सोशल मीडियावर आपले नवनवे फोटो शेअर करून सगळ्यांना आश्चर्यचकित करत असते. 

पंजाबची हार्टथ्रोब असलेल्या शहनाजने नुकतेच तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये शहनाज गिल हिरव्या रंगाच्या फरी ड्रेसमध्ये तिचा हॉट अवतार दाखवताना दिसली आहे. 

तिने सोनेरी कानातले घालून तिचा लूक पूर्ण केला आणि डोळ्यांसाठी ब्लॅक-स्मोकी लूक निवडला आहे. 

तिने या फोटोंना कॅप्शन देताना लिहिले की, ‘तीव्रता हा खेळ आहे; आकर्षण त्याचे नाव आहे.’ 

या फोटोंमध्ये ती नेहमीप्रमाणेच सर्वात सुंदर दिसत आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

बोटात स्टेटमेंट रिंग आणि हातात स्टायलिश ब्रेसलेट, पायात काळे स्टिलेटोज घातलेली शहनाज किलर दिसत आहे.