षटतिला एकादशीपासून या राशींना पैशांचा लाभ होणार  

By Rohit Bibhishan Jetnavare
Feb 03, 2024

Hindustan Times
Marathi

६ फेब्रुवारीला षटतिला एकादशीचे व्रत केले जाणार आहे. या दिवशी विधीनुसार भगवान विष्णूची उपासना केला जाते.

हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षटतिला एकादशीचे व्रत केले जाते.

या दिवशी भगवान विष्णूची उपासना केल्यास भक्तांना इच्छित फळ मिळते.

यावेळी षटतिला एकादशीला एक खास योग बनत आहे. या दिवशी व्याघत योग, हर्ष योग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा संयोग होणार आहे.

त्यामुळे भगवान विष्णूच्या कृपेने काही राशींवर धन वर्षाव होण्याचा योग निर्माण झाला आहे.

मिथुन षटतिला एकादशीपासून मिथुन राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरू होणार आहेत. या राशींच्या लोकांना पैशांचा लाभ होईल. तसेच, सर्वप्रकारच्या कामात यश येईल.

सिंह षटतिला एकादशी सिंह राशीच्या लोकांना खूप शुभ मानली जात आहे. या राशींच्या लोकांनाही पैशांचा लाभ होईल. व्यवसायात यश मिळेल.

तूळ  षटतिला एकादशीपासून तूळ राशीच्या लोकांवर भगवान विष्णू पैशांचा वर्षाव करतील. सोबतच व्यापारात यश येईल.

मानसी नाईकच्या राजकारण 'स्टेप'ची चर्चा!