सूर्यास्तानंतर शंखनाद करावा की नाही? जाणून घ्या...
By
Harshada Bhirvandekar
Aug 11, 2024
Hindustan Times
Marathi
हिंदू धर्मात उपासनेबाबत अनेक नियम दिले आहेत. नियमांशिवाय केलेल्या पूजेला महत्त्व नसते, असे मानले जाते.
पूजेच्या वेळी शंखानाद करण्याचे देखील काही नियम आहेत. शंखनादाशिवाय पूजा अपूर्ण आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
असे मानले जाते की, शंख फुंकल्याने घरात दैवी शक्तींचा संचार होतो.
पण, संध्याकाळी पूजेच्या वेळी शंख वाजवा की नाही, हे तुम्हाला माहित आहे का?
संध्याकाळच्या पूजेच्या वेळी शंख वाजवू नये, असे पुराणात सांगितले गेले आहे.
याचे कारण असे सांगितले जाते की, सूर्यास्तानंतर देवी देवता निद्रिस्त होतात आणि त्यांची झोप शंखनादामुळे खंडित होऊ शकतो.
यासोबतच वातावरणातील उर्वरित जीवजंतूही विस्कळीत होतात.
रात्रीच्या पूजेचा पूर्ण लाभ हवा असेल, तर रात्री शंखाचा वापर करू नये.
मात्र, लग्नाच्या वेळी रात्री शंख फुकणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. शंख नादाशिवाय विवाह पूर्ण मानला जात नाही.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा