शनि जयंतीला ३ राशींचं नशीब सोन्यासारखं चमकेल

By Rohit Bibhishan Jetnavare
Jun 01, 2024

Hindustan Times
Marathi

आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी त्यांची पूजा केल्याने व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. 

शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळविण्यासाठी शनि जयंतीचा सर्वाधिक शुभ आहे. यंदा शनि जयंती ६ जून २०२४ रोजी साजरी होणार आहे.

ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला न्यायाचा देवता म्हटले आहे. शनिदेव लोकांना त्यांच्या कर्माच्या आधारे फळ देतात.

शनि जयंतीच्या दिवशी काही राशींचे नशिब चमकणार आहे. त्या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.  

शनि देवाच्या कृपेने मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. आर्थिक संकट आणि कर्जापासून मुक्ती देईल. 

मेष

या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरदार लोकांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळू शकते. आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे.

मिथून राशीच्या लोकांनाही शनिदेवाची विशेष कृपा असेल. या राशीच्या लोकांचा अध्यात्माकडे जास्त कल असेल. 

मिथून

मानसिक तणावातून आराम मिळेल. काहीतरी नवीन शिकता येईल. शैक्षणिक क्षेत्रात भरीव यश मिळू शकते आणि आर्थिक लाभही मिळू शकतो.

कुंभ राशीच्या लोकांवरही शनिदेव कृपा करतील. या राशीच्या लोकांना काहीतरी नवीन करण्याची संधी मिळू शकते. 

कुंभ

शनी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. त्यामुळे काही समस्या निर्माण होतील, परंतु शनिदेवाच्या कृपेने तुम्ही त्यावर सहज मात करू शकाल. 

घरात गंगाजल ठेवलंय? मग करू नका ‘या’ चुका!