शनि जयंतीला हे  उपाय करा

By Rohit Bibhishan Jetnavare
May 24, 2024

Hindustan Times
Marathi

सनातन धर्मात शनि जयंतीचा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यंदा शनि जयंती (गुरुवारी) ६ जून आहे. 

या दिवशी शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. शनिदेवाची पूजा केल्याने शुभ फळ मिळते. याशिवाय घरात सुख-शांती नांदते.

शनि जयंतीच्या दिवशी शिव आणि शनीची कृपा मिळवायची असेल तर कावळ्यांना भाकरी खायला द्यावी. 

कावळ्यांना जेवण द्या

कावळा हे सूर्यपुत्राचे वाहन आहे. शिवाय, ते त्यांना खूप प्रिय आहे. त्यामुळे शनि जयंतीच्या दिवशी कावळ्यांना भाकरी आणि पाणी द्या.

शनि जयंतीला कापूर काळ्या कपड्यात बांधून घराच्या टेरेसच्या किंवा दारावर लटकवा. यानंतर, सूर्यास्ताची प्रतीक्षा करा आणि नंतर ते जाळून टाका. 

 कापूराचा उपाय

असे केल्याने राहूचा वाईट प्रभाव नाहीसा होतो. याशिवाय कुंडलीतून शनि दोषही दूर होतो, परंतु हा उपाय करताना कोणाच्याही नजरेस पडू नये.

शनि जयंतीच्या एक दिवस आधी एका भांड्यात मोहरीचे तेल काढून ठेवावे. यानंतर त्या तेलात थोडे काळे तीळ टाकून शमीच्या झाडाजवळ ठेवावे. 

मोहरीच्या तेलाचा दिवा लावा

त्यानंतर शनि जयंतीला त्याच तेलाने दिवा लावावा. असे केल्याने जीवनातील सर्व अडथळे संपतात.

ओळखा पाहू ही बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री कोण?