शनिदेवाला प्रसन्न करायचंय? मग ‘हे’ उपाय जाणून घ्या!

By Harshada Bhirvandekar
Jun 26, 2024

Hindustan Times
Marathi

कलियुगात न्यायदेवता आणि कर्मफलदाता म्हणून शनिदेवाची पूजा केली जाते.

शनिदेव एखाद्याला रंकाचा राजा आणि राजाचा रंक देखील बनवू शकतात.

शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी भक्त वेगवेगळे उपाय करतात. जाणून घ्या काही सोपे उपाय...

शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी शनिदेवाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन मोहरीचे तेल अर्पण करावे.

शनिदेवाचे दर्शन घेताना त्यांच्या चरणी मोहरीचे तेल अर्पण करावे, हे लक्षात ठेवा.

शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काळे वस्त्र आणि लोखंडी वस्तूचे दान करावे. या दिवशी कुणाला त्रास देऊ नये.

वडिलधाऱ्यांचा आदर केल्यास भगवान शनि हळूहळू प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा होते.

शनि हा असा ग्रह आहे, जेव्हा एखाद्या घरात मोठ्यांचा अपमान होतो, तेव्हा ते शिक्षा करतात. 

शनिदेवाला आनंदी करण्यासाठीच भक्त त्यांची पूजा करतात. तुम्ही देखील हे सोपे उपाय करू शकता. 

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी करा ‘हे’ काम!