शाहीदच्या 'या' सवईंमुळे कंटाळली  होती करीना कपूर 

By Ninad Vijayrao Deshmukh
May 11, 2024

Hindustan Times
Marathi

शाहिद कपूर आणि करीना कपूर दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी एकमेकांना डेट केल्यावर त्यांचे ब्रेकअप झाले होते. 

शाहिद आणि करीना दोघे लग्न करणार अशा चर्चा होत्या. मात्र, दोघामध्ये ब्रेकअप झाल्याने ही शक्यता मावळली. करीनाने सेफ अली खानशी  लग्न केले. 

करीना कपूर आणि शाहिद कपूर एकदा 'कॉफी विथ करण' या शो मध्ये पोहोचले होते. या शोमध्ये त्यांनी त्यांच्या बद्दल खुले पणाने चर्चा केली होती. 

करण जोहरने शाहिदला विचारले की करीना त्याच्या कोणत्या गोष्टी पासून सर्वाधिक कंटाळलेली होती. यावर त्याने उत्तर दिले, 'झोपण्याची सवय'. 

शाहिदला करणने विचारले की, त्याचा आवडीचा रंग आणि त्याची जवळची मैत्रीण कोण आहे? यावर त्याने लाल रंग आणि अमृता अरोरा हीचे नाव घेतले. 

शाहिदने संगितले की करीना कपूरला जॉन अब्राहम सोबत कधीच काम करायचे नव्हते. 

शाहिद कपूरने करीनाच्या आवडी निवडी बद्दल सगळी काही योग्य माहिती दिली. ज्यामुळे दोघांच्याही जोडीला बेस्ट म्हटल्या गेले होते. 

 करीना आणि शाहिदच्या ब्रेकअप मागे आई बाबीता आणि बहीण करिश्मा ही असल्याचे बोलले जाते. 

नारळ पाण्याचे त्वचेसाठी काय आहेत फायदे?

Pexels