बॉलिवूडचा बादशहा अर्थात अभिनेता शाहरुख खान याने आपल्या अभिनयाच्या जोरावर जगभरात नाव कमावले आहे.
शाहरुखचा कोणताही चित्रपट रिलीज झाला की, तो मोठ्या पडद्यावर सुपरहिट ठरणार हे नक्की असतं.
मात्र, शाहरुखचे असे सहा चित्रपट आहेत, जे कधीच रिलीज होऊ शकले नाहीत. चला जाणून घेऊया....
‘कुची कुची होता है’ हा शाहरुख खानच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाचा कार्टून व्हर्जन होता. मात्र, हा चित्रपट कधीच पूर्ण झाला नाही.
शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांचा ‘राष्क’ हा चित्रपट देखील मोठ्या पडद्यावर कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही.
२०१५मध्ये शाहरुख खानचा चित्रपट ‘अहमक’ ‘मामी’ फेस्टिवल मध्ये दाखवला गेला होता. मात्र, तो थिएटरमध्ये कधीच रिलीज झाला नाही.
शाहरुख खानचा चित्रपट ‘शिखर’ची शूटिंग जवळपास पूर्ण झाली होती. मात्र, रिलीज आधीच हा चित्रपट डबाबंद झाला.
२०११ मध्ये शाहरुख खानने हॉलिवुड चित्रपट ‘एक्स्ट्रीम सिटी’साठी शूटिंग सुरू केलं होतं. मात्र, हा चित्रपट कधीच पूर्ण झाला नाही.
१९९६ मध्ये शाहरुख खानने ‘किसी से दिल लगाकर तो देखो’ या चित्रपटाची घोषणा केली होती. याचं पोस्टर देखील चर्चेत होतं. मात्र, हा चित्रपट रिलीज आधीच बंद पडला.