देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहर भारतातीलच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत शहर आहे. येथे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ति राहतात.
पण तुम्हाला मुंबईतील सर्वाधिक महाग आणि श्रीमंत व्यक्ति राहणारे परिसर माहिती आहेत का ?
आज तुम्हाला मुंबईच्या सर्वाधिक सात महागड्या परिसराची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
मलबार हिल्स हा मुंबईतील सर्वात पॉश एरिया आहे. हा शरातील सर्वात महाग रहिवासी परिसर आहे. या ठिकाणी देशातील अनेक श्रीमंत नागरिक राहतात. अनेक सुविधा असलेल्या या परिसरात राहण्याची अनेकांची इच्छा असते.
कफ परेड हा मुंबईतील दूसरा सर्वात महाग आणि राहण्यासाठी महगडा परिसर आहे. शहराच्या दक्षिण भागातील या परिसरात रतन टाटा यांच घर आहे. तसेच या परिसरात अनेक श्रीमंत नागरिक राहतात. येथे अनेक फाइव्ह स्टार हॉटेल्स आहेत. तसेच येथून मुंबईचा समुद्र किनारा दिसतो.
दक्षिण मुंबईत असलेला तारदेव परिसर हा देखील मुंबईतील सर्वात श्रीमंत परिसरापैकी एक आहे. या ठिकाणी अंबानी परिवारासह अनेक श्रीमंत व्यक्ति राहतात. या ठिकाणी अनेक शिक्षण संस्था आणि व्यावसायिक इमारती आहेत.
जुहू हा मुंबईतील प्रसिद्ध एरिया आहे. या ठिकाणी अनेक बॉलीवूड स्टार्स राहतात. या ठिकाणी घरांच्या आणि जमिनीच्या किमती या गगनाला भिडल्या आहेत.
मुंबईच्या बांद्रा परिसरात देखील अनेक सेलीब्रेटी राहतात. या सोबतच बॉलीवूडचे अनेक अभिनेते देखील या परिसरात राहतात. त्यामुळे हा परिसर देखील शहरातील सर्वाधिक महागड्या परिसरापैकी एक आहे.
मुंबईतील वरळी परिसर हा उंच इमारतींसाठी प्रसिद्ध आहे. कमर्शियल प्रॉपर्टी असल्याने हा परिसर देखील मुंबईतील महागड्या परिसरापैकी एक आहे.
मुंबईतील कुलाबा परिसर देखील महागडा परिसर आहे. या ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया आहे. रहिवासी परिसर असलेल्या या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळे देखील आहेत.