भारताची लांब उडी!  जगातील सर्वात लांब बोगदा प्रत्यक्षात

By Ganesh Pandurang Kadam
Mar 09, 2024

Hindustan Times
Marathi

जगातील सर्वात लांब दुपदरी बोगदा ठरलेल्या सेला बोगद्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.

सुमारे ८२५ कोटी रुपये खर्चून चार वर्षांत हा बोगदा तयार करण्यात आला आहे.

चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा बोगदा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

सेला बोगद्यामुळं तेजपूर ते तवांग प्रवासाचा वेळ एक तासानं कमी होणार आहे.

याआधी बर्फवृष्टीच्या काळात 'सेला पास' हा मार्ग अनेक महिने बंद राहायचा. बोगद्यामुळं ती अडचण दूर होणार आहे.

सेला बोगदा १३०० फूट उंच असून चिनी सीमेच्या अगदी जवळ आहे.

चीनच्या सीमेवर तैनात भारतीय सैनिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

चीनशी लागून असलेल्या सीमेच्या सुरक्षेच्या दृष्टीनंही हा बोगदा महत्त्वपूर्ण आहे.

टॉपलेस होऊन तृप्ती डिमरीने लावली इंटरनेटवर आग!