रस्त्यावर नाचताना बघून ‘या’ अभिनेत्रीला लोक समजले भिकारी!

By Harshada Bhirvandekar
Aug 12, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सारा अली खान आज (१२ ऑगस्ट) तिचा २९वा वाढदिवस साजरा करत आहे.

फार कमी वयातच साराने बॉलिवूडमध्ये आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

अभिनयाचा वारसा सारा अली खानला तिच्या आई-वडिलांकडून आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाकडून मिळाला आहे.

सारा अली खान लहानपणापासूनच खूप खट्याळ आहे. ती स्वतः आपले किस्से शेअर करत असते.

असंच एकदा लहानपणी सारा आपल्या कुटुंबासोबत बाहेर फिरायला गेली होती.

त्यावेळी सारा, लहानगा इब्राहीम आणि त्यांना सांभाळणारी आया बाहेर उभे होते, तर अमृता आणि सैफ एका दुकानात गेले होते.

त्यावेळी साराने चक्क तिथेच नाचायला सुरूवात केली होती. तिचा डान्स पाहून लोकांनी तिला पैसे द्यायला सुरुवात केली होती.

तर, लोक आपल्याला पैसे देतायत हे लक्षात आल्यावर सारा अली खान अजून नाचून दाखवत होती.

चिमुकल्या सारा अली खानचा हा नटखट अंदाज आजही तिच्या कुटुंबाला आठवला की सगळ्यांना हसू येतं.

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!