केसांच्या वाढीस मदत करणारे सीड्स

Photo Credits: Unsplash

By Hiral Shriram Gawande
Aug 06, 2024

Hindustan Times
Marathi

तुमचा आहार आणि खाण्याच्या सवयींचा थेट परिणाम तुमच्या केसांच्या आरोग्यावर होतो. केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी निरोगी पदार्थ खाणे आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे.

Photo Credits: Pexels

केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी येथे काही सीड्स आहेत जे तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता.

Video Credits: Pexels

फ्लेक्स सीड्स

Photo Credits: Unsplash

फ्लेक्स सीड्समध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड असतात, जे केसांच्या वाढीस मदत करतात. ते आवश्यक जीवनसत्त्वे समृध्द असतात जे तुमचे केस मजबूत करण्यास आणि केस गळणे कमी करण्यास मदत करतात.

Photo Credits: Pexels

भोपळ्याच्या बिया

Photo Credits: Unsplash

भोपळ्याच्या बियांमध्ये फॅटी अॅसिड असतात जे केसांच्या वाढीसाठी चांगले असतात. त्यामध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम, लोह आणि प्रथिने असतात, जे तुमचे केस मजबूत करण्यास आणि केस गळणे टाळण्यास मदत करतात.

Photo Credits: Unsplash

मेथीचे दाणे

Photo Credits: Flickr

मेथी दाण्यांमध्ये निकोटिनिक ॲसिड आणि लेसिथिन असते जे तुमच्या केसांना प्रोटीन देतात. ते केस गळण्यास प्रतिबंध करतात आणि केस लांब होण्यास मदत करतात. त्यामध्ये जीवनसत्त्वे असतात जे केसांच्या कूपांना उत्तेजित करतात आणि टाळूचे आरोग्य सुधारतात.

Photo Credits: Pexels

तीळ

Photo Credits: Pexels

आहारात तीळाचा समावेश केल्याने केसांची निरोगी वाढ होण्यास मदत होते. ते जीवनसत्त्वे, खनिजे, फायटोस्टेरॉल आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडमध्ये समृद्ध आहेत, जे केसांच्या वाढीसाठी उत्तम आहेत.

Photo Credits: Pexels

मानसी नाईकच्या राजकारण 'स्टेप'ची चर्चा!