सावनी रविंद्र पॉडकास्टमधून देणार सांगीतिक मेजवानी!

By Harshada Bhirvandekar
Aug 24, 2024

Hindustan Times
Marathi

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्र ही नेहमीच काहीतरी नवनवीन गोष्टी तिच्या प्रेक्षकांसाठी करत असते.  

तिने नुकताच सावनी म्युझिक पॉडकास्ट शो सुरु केला आहे. हा शो संगीतविश्वातील पहिलाच ‘मराठी म्युझिक पॉडकास्ट’ आहे. 

यात ती स्वतः लोकप्रिय गायक, संगीतकार, वादक यांच्यासोबत मनसोक्त संगीतविषयक गप्पा मारणार आहे. 

या पॉडकास्टच्या पहिल्याच भागात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायक राहुल देशपांडे हे हजेरी लावणार आहेत. 

यापूर्वी सावनीने मराठी, हिंदी,  गुजराती, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नडा, कोंकणी अशा प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. 

तसेच गेल्यावर्षीच्या बहुचर्चित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील सावनीने गायलेली मंगळागौर सगळ्यांच्याच पसंतीस पडली होती. 

नवनवीन प्रयोग करू इच्छिणाऱ्या गायकांसाठी, तसेच या क्षेत्रात असणाऱ्या सर्व कलाकारांसाठी, जाणकार प्रेक्षकांसाठी मी हा पॉडकास्ट सुरू केल्याचे तिने म्हटले.

संगीताची विद्यार्थी म्हणून गेली अनेक वर्ष या संगीतसृष्टीत काम करत आहे, यात अनेक चढ उतार पाहिल्याचे ती सांगते.

आता तिच्या या पॉडकास्टमधून सगळ्याच रसिक श्रोत्यांना सांगीतिक मेजवानी मिळणार आहे.

ही नट्स टाळतात हार्ट अटॅक