Enter text Here

तितीक्षा तावडेच्या ओठाला नक्की झालं तरी काय?

By Harshada Bhirvandekar
Jun 06, 2024

Hindustan Times
Marathi

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत नेत्रा-अद्वैतच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. 

मालिकेत नेत्रा ही भूमिका अभिनेत्री तितीक्षा तावडे साकारत आहे. अशातच मालिकेच्या सीन शूटदरम्यान तितीक्षाला दुखापत झाली होती.

तितीक्षा टीमसह आउटडोर शूटला असताना एका सीन दरम्यान तिला दुखापत झाली.

पाचवी पेटी मिळवण्यासाठी कळसावर चढणे, विरोचकला दरीत ढकलण्याचा सीन शूट करण्यासाठी ते आउटडोरला आले होते.

एका सीनच्या दरम्यान तिच्या मागे कॅमेरा होता, तोच मागे वळताना तिच्या लक्षात न आल्याने कॅमेरा तिच्या ओठाला लागला.

या दुखापतीमुळे तितीक्षा तावडे हिच्या वरच्या ओठाला २ टाके पडले आहेत.

त्यानंतर तितीक्षाचा नवरा सिद्धार्थ तिला डॉक्टरकडे घेऊन गेला. ओठाला थोडी सूज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

मात्र, इतकी दुखापत होऊनही दुसऱ्या दिवशी पुन्हा तितीक्षा ऑन टाइम सेटवर चित्रीकरणाला पोहोचली. 

तितीक्षाच्या ओठाला टाके असल्याने तिच्या बोलण्यावरुन तिला बरं वाटलं नसल्याचंही मालिकेत दिसलं.

All Photo: Instagram

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान