किती होती अभिनेत्री तितीक्षा तावडेची पहिली कमाई?

All Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
Jun 18, 2024

Hindustan Times
Marathi

प्रत्येकासाठी त्याची पहिली स्वकमाई महत्वाची असते, मग तो सर्वसामान्य माणूस असो किंवा सुप्रसिद्ध कलाकार.

आज सर्वांची लाडकी नेत्रा म्हणजेच तितिक्षा तावडेने आपल्या पहिल्या कमाईची आठवण आणि अनुभव सांगितला.

तितीक्षाने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. यासाठी तिला १००० रुपये स्टायपेंड मिळायची.

महिन्याकाठी १००० रुपये ही तितीक्षा तावडे हिची पहिली कमाई होती. हे पैसे साठवून तिने केस स्ट्रेट केले होते.

हॉटेल मॅनेजमेंटच्या दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात तिला १००० रुपये स्टायपेंड मिळत होती.

६ महिने स्टायपेंडची बचत करून जेव्हा ६००० जमा झाले, तेव्हा तिने जाऊन स्वतःचे हेअर स्ट्रेट केले होते. 

तितीक्षा म्हणते, तेव्हा ती माझी गरज होती आणि पण मला त्याच्यासाठी आई-बाबांचे पैसे वापरायचे नव्हते. 

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तितीक्षाला पहिला पगार ११५०० रुपये मिळाला होता. तेव्हा ती एका ठिकाणी काम करत होती. 

एका प्रसिद्ध फूड चेनच्या आउटलेटसाठी ट्रेनी म्हणून तिने काम केलं होतं. या पगारातून तिने आई-बाबा आणि ताईसाठी कपडयांची खरेदी केली होती.

लेडी सुपरस्टार नयनताराच्या साडीत दिलखेचक अदा 

Instagram