बॅकलेस चोळीत सारा अली खानचा गुजराती लूक!

By Harshada Bhirvandekar
Jul 09, 2024

Hindustan Times
Marathi

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या हळदीमध्ये अभिनेत्री सारा अली खान गुजराती लेहेंगामध्ये दिसली होती. 

तिचा हा आऊटफिट फॅशन डिझायनर मयूर गिरोत्रा​​यांनी डिझाईन केला होता. तर, तान्या घावरीने त्याला स्टाईल केले आहे. 

या मल्टी कलर लेहेंग्यावर लाल, निळ्या, हिरव्या आणि नारंगी धाग्यांपासून बनवलेल्या फुलांसह अनेक डिझाइन्स आहेत.

खड्यांसह त्यावर मिरर वर्क देखील करण्यात आले आहे. या स्कर्टची हेमलाइन सोनेरी, निळ्या आणि लाल रंगात आहे.

या लेहेंग्यासोबतच सारा अली खानची चोळीही मल्टीकलरमध्ये डिझाईन करण्यात आली आहे. 

सारा अली खान डीप व्ही-नेकलाइन आणि वन-थर्ड ब्लाउजमध्ये तिची कर्व्ही फिगर फ्लाँट करताना दिसली.

या बॅकलेस चोळीला एका धाग्याने बांधण्यात आले आहे. तर, चोळीला मॅचिंग लटकन देखील लावण्यात आले आहेत.

ग्लॉसी मेकअपमध्ये काजळ, लायनर, ब्राऊन शेड आय शॅडोसोबत गुलाबी लिपस्टिक लावत तिने आपला मेकअप केला होता.

सारा अली खानच्या या आऊटफिटमधील दुपट्ट्यावरही धाग्याचचे भरतकाम आणि मिरर वर्क केले गेले आहे.

बादलों का घर! श्रेया बुगडेचे कश्मीर फोटो