संकष्ट चतुर्थीच्या पूजेत करा या मंत्रांचा जप, होणार गणपती बाप्पाची कृपा!

By Priyanka Chetan Mali
Jan 17, 2025

Hindustan Times
Marathi

हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीच्या व्रताला खास महत्व आहे. शुक्रवार १७ जानेवारी २०२५ रोजी या वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे.

संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी करतात. या दिवशी प्रथम पुजनीय गणपती बाप्पाची पूजा करतात.

मान्यतेनुसार, या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्याने, चंद्राला अर्घ्य दिल्याने व उपवास केल्याने जीवनात शुभ लाभ होतात.

या दिवशी काही खास मंत्रांचा जप केल्याने गणपती बाप्पा आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि कृपा करतात. जाणून घ्या हे मंत्र-

पहिला मंत्र - वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा| निर्विघ्नं कुरु मे देव सर्व-कार्येषु सर्वदा||

दुसरा मंत्र - ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतये| वर्वर्द सर्वजन्म में वश्यं वषमान्य नमः||

तीसरा मंत्र - ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा। 

ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरू गणेश। ग्लौम गणपति, ऋद्धि पति, सिद्धि पति। करों दूर क्लेश।। 

ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरू गणेश। ग्लौम गणपति, ऋद्धि पति, सिद्धि पति। करों दूर क्लेश।। 

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

लिंबाचे सरबत

नाश्ता करण्याआधी लिंबू पाणी प्यायल्याचे फायदे

PEXELS