संजू सॅमसनचा खास रेकॉर्ड

AFP

By Rohit Bibhishan Jetnavare
Mar 24, 2024

Hindustan Times
Marathi

IPL २०२४चा चौथा सामना (२४ मार्च) राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. 

AFP

जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर राजस्थानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि  १९३ धावा केल्या.

AFP

राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने नाबाद ८२ धावा केल्या.त्याने कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळताना ५२ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकार ठोकले.

AFP

या खेळीनंतर संजूने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. संजूने सलग पाचव्यांदा राजस्थानच्या पहिल्या पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले आहे.

AFP

या मोसमात राजस्थान रॉयल्सचा हा पहिला सामना आहे आणि संजूने पुन्हा एकदा ५०हून अधिक धावा केल्या आहेत.

AFP

संजूने २०२० मध्ये सीएसकेविरुद्ध ३२ चेंडूत ७२ धावा केल्या होत्या. हा राजस्थान रॉयल्सचा २०२० च्या आयपीएलचा पहिला सामना होता.

AFP

यानंतर संजूने २०२१ मध्ये पंजाबविरुदध ६३ चेंडूत ११९ धावा केल्या होत्या. हादेखील त्या सीझनचा राजस्थानचा पहिला सामना होता.

AFP

२०२२ च्या आयपीएलमध्ये संजूने हैदराबादविरुद्ध २७ चेंडूत ५५ धावा केल्या होत्या. हाही २०२२ चा राजस्थानचा पहिला पहिला सामना होता.

२०२३ मध्येही संजूने राजस्थान रॉयल्सच्या पहिल्या सामन्यात हैदराबादविरुद्ध ३२ चेंडूत ५५ धावा केल्या होत्या. 

आता यंदादेखील संजूने राजस्थान रॉयल्सच्या पहिल्या सामन्यात ३२ चेंडूत ७२ धावा केल्या.  

AFP

कामदा एकादशीच्या रात्री हे उपाय करा