सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ६ मधील फीचर्स लीक!

By Ashwjeet Rajendra Jagtap
Jun 28, 2024

Hindustan Times
Marathi

सॅमसंगचे नवीन फोल्डेबल डिव्हाइस गॅलेक्सी झेड फोल्ड ६ आणि झेड फ्लिप ६ हे येत्या १० जुलै रोजी लॉन्च होणार आहेत.

लवकरच सॅमसंग कंपनीचा फोल्डेबल स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च होणार आहेत.

येत्या १० जुलैला सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ६ आणि सॅमसंग झेड फ्लिप ६ बाजारात दाखल होत आहेत.

मात्र, लॉन्चिंगपूर्वीच या दोन्ही स्मार्टफोनमधील फीचर्स लीक झाले आहेत.

लीक झालेल्या माहितीनुसार, गॅलेक्सी झेड फोल्ड ६ हा सिल्व्हर आणि डार्क नेव्ही ब्लू अशा दोन रंगात उपलब्ध होऊ शकतो.

तर, सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ६ लाईट ब्लू आणि सिल्व्हर अशा दोन रंगात लॉन्च होऊ शकतो.

दोन्ही मॉडेल्ससाठी अपेक्षित अपग्रेडमध्ये स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेटमध्ये बदल समाविष्ट आहे.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ६ दमदार बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. 

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ६ मध्ये पातळ प्रोफाइल आणि ऑप्टिमाइझ्ड आस्पेक्ट रेशो असेल.

निरोगी नात्यासाठी टिप्स