बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांची खरी नावं माहितीयेत का?

By Harshada Bhirvandekar
Jun 20, 2024

Hindustan Times
Marathi

चित्रपटसृष्टीत कलाकार त्यांच्या नावाने ओळखले जातात. मात्र, असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी इंडस्ट्रीत येण्यापूर्वी आपली नावे बदलली आहेत.

कियाराचे खरे नाव कियारा नसून आलिया आहे. कियारा अडवाणीने सलमान खानच्या विनंतीवरून तिचे नाव बदलले होते.

शिल्पा शेट्टीचे खरे नाव अश्विनी शेट्टी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिचे नाव तिच्या आईने बदलले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानच्या आजीने त्याचे नाव अब्दुल रशीद खान ठेवले होते. नंतर वडिलांनी त्याचे नाव बदलून शाहरुख ठेवले.

सलमान खानचे खरे नाव अब्दुल राशिद सलीम सलमान खान होते. सलमान खानचे हे नाव त्याचे वडील सलीम खान आणि आजोबा अब्दुल रशीद खान यांच्या नावाने बनले आहे.

अक्षय कुमारचे खरे नाव राजीव भाटिया होते. चित्रपटात आल्यानंतर त्यांनी नाव बदलले.

बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचे खरे नाव गौरांग चक्रवर्ती आहे.

रजनीकांत हे अभिनेत्याचे खरे नाव नसून, त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे.

रेखाचे खरे नाव भानुरेखा गणेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने चित्रपटात काम करण्यासाठी तिचे नाव रेखा असे लहान केले होते.

ही फळं त्वचेला देतात चमक

Pexels