माय-लेकीचा स्वॅगच भारी! सखी आणि शुभांगी गोखलेंचे फोटो बघाच

By Harshada Bhirvandekar
May 15, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय मायलेकी म्हणजेच अभिनेत्री शुभांगी गोखले आणि सखी गोखले.

सखी गोखले आणि शुभांगी गोखले यांनी आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

सखी आणि शुभांगी या दोघी मायलेकी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतात.

सखी आणि शुभांगी गोखले यांनी नुकतेच सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.

या सुंदर फोटोंमध्ये सखी आणि शुभांगी या मायलेकींचा सुंदर मनमोहक अंदाज पाहायला मिळाला आहे.

या फोटोशूटसाठी दोघींनीही खास कॉटनच्या साड्या नेसल्या असून, त्यांच्या या साड्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

सुंदर कॉटनच्या साड्या, सिल्व्हर दागिने आणि चेहऱ्यावर गोंडस हसू अशा लूकने सगळेच घायाळ झाले आहेत.

शुभांगी गोखले आणि सखी गोखले यांच्या या लक्षवेधी फोटोशूटला चाहत्यांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.

‘Womanhood Is Truly The Best!’ असे कॅप्शन देत त्यांनी हे खास फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.

All Photos: Instagram

बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?