सारा तेंडुलकरचा गाबाच्या स्टेडियमवर जलवा! चाहते झाले घायाळ!

By Ninad Vijayrao Deshmukh
Dec 16, 2024

Hindustan Times
Marathi

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही तिच्या ग्लॅमरस अंदाज व हॉट लुकसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे ती नेहमी चर्चेत असते. 

सारा ही भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ब्रिसबेन येथे सुरू असलेल्या तिसरा कसोटीसामना पाहण्यासाठी गाबा स्टेडियम येथे गेली होती. 

यावेळी तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या पेहरावात ती एखादा अप्सरा सारखी दिसत होती. 

ब्युटि क्वीन साराने पुन्हा एकदा सिद्ध केलं की फॅशन आणि ग्लॅमरमध्ये ती कुणापेक्षा कमी नाही. 

क्रिकेट प्रेमी सारा ही माजी क्रिकेट पटू जाहीर खानची पत्नी सागरिका सोबत स्टेडियममध्ये दिसली. 

काळ्या रंगाचा गॉगल, स्मित हास्य आणि मोकळ्या सोडलेल्या केसांनी  तिच्या सौंदर्यात आणखी भर घातली. 

सचिनची लाडकी असलेली सारा हिला फिरण्याचा छंद आहे. तिला जेव्हा केव्हा संधी मिळते तेव्हा ती फिरायला जाते. 

सारा नुकतीच भाऊ अर्जुन सोबत दुबई येथे फिरायला गेली होती. यावेळी त्यांनी खूप धम्माल आणि शॉपिंग केली. 

साराने परदेशातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले असून सध्या ती मॉडल म्हणून काम करते. या सोबतच सोशल मिडियावर विविध जाहिरातीतून देखील ती बक्कळ कमाई करते. 

तिला सोशल मिडियावर ७ मिलियन पेक्षा अधिक जण फॉलो करतात.   

पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी