रितिकाचा बर्थडे

By Rohit Bibhishan Jetnavare
Dec 21, 2024

Hindustan Times
Marathi

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याची पत्नी रितिका हिचा आज वाढदिवस आहे.

रितिकाचा जन्म आजच्या दिवशी १९८७ मध्ये झाला. रितिकाच्या ३७व्या वाढदिवसानिमित्त रोहित शर्माने तिला खास शुभेच्छा दिल्या. 

रोहितने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये बायकोसाठी गोड शब्द लिहिले आहेत.

रोहितने लिहिले की, "हॅपी बर्थडे रित्सा (रितिका). मी आयुष्यभर आनंद साजरा करेन, की तू माझ्यासोबत आहेस. तुझा दिवस आनंदी जावो."

रोहित आणि रितिका यांचे १३ डिसेंबर २०१५ रोजी लग्न झाले होते. त्यांना २ मुले आहेत. 

रोहित-रितिकाच्या मुलीचे नाव समायरा आणि मुलाचे नाव अहान आहे.

रोहित शर्मा सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४/२०२५ साठी ऑस्ट्रेलियात आहे. 

५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तीन सामने झाले असून मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे.

या मालिकेत अजून २ सामने बाकी आहेत, जे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत.

Enter text Here