२०२७ वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माचं वय किती असेल?

By Rohit Bibhishan Jetnavare
Feb 10, 2025

Hindustan Times
Marathi

टीम इंडियाचा वनडे आणि कसोटी कर्णधार रोहित शर्माचा जन्म ३० एप्रिल १९८७ रोजी झाला.

रोहित शर्माचे वय सध्या ३७ वर्षे आहे. तो या वर्षी एप्रिलमध्ये ३८ वर्षांचा होईल.

आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला वर्ल्डकप ट्रॉफी मिळवून देण्याचे रोहित शर्माचे स्वप्न २०२३ मध्ये भंगले होते.

आता पुढील वर्ल्डकप २०२७ मध्ये होणार आहे. तेव्हा रोहितकडे ट्रॉफी जिंकण्याची संधी असेल.

पण तोपर्यंत रोहित शर्मा वय ४० वर्षांचा होईल. अशा स्थितीत २०२७ चा वर्ल्डकप खेळणे खूपच कठीण आहे. पण अशक्य नाही.

20रोहित शर्मा आता ICC ची मोठी स्पर्धा, चॅम्पियन्स ट्रॉफीत दिसणार आहे. ही ट्रॉफी मिळवून देण्याची सुवर्ण संधी त्याच्याकडे आहे. 

रोहित शर्माने आतापर्यंत भारतासाठी २६५ वनडे सामने खेळले आहेत.

यात रोहित शर्माने ५७ अर्धशतकं आणि ३२ शतकं केली आहेत. त्याच्या नावावर १०९८७ धावा आहेत.

माघ पौर्णिमेला या ठिकाणी दिवे लावल्यास प्रसन्न होईल देवी लक्ष्मी