रस्ते अपघातात कोणती राज्य आघाडीवर ? 'या' राज्यात सर्वाधिक होतात अपघात

By Ninad Vijayrao Deshmukh
Dec 14, 2024

Hindustan Times
Marathi

रस्ते अपघातात उत्तर प्रदेश राज्याचा पहिला क्रमांक लागतो 

रस्ते अपघात कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध उपाय योजना करतात.  मात्र, असे असतांना दरवर्षी रस्ते अपघात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. 

देशात दरवर्षी तब्बल १.७८ कोटी नागरिकांचा मृत्यू रस्ते अपघातात होतो. ही माहिती रस्ते आणि वाहतूक मंत्रालयातर्फे संसदेत देण्यात आली आहे. 

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार रस्ते अपघात मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये ६० टक्के ही १८ ते ३५ वर्ष वयोगटातील असतात. लेनची शिस्त न पाळणे, हेल्मेट न घालणे ही अपघाताची मुख्य कारने असल्याची माहिती गडकरी यांनी संसदेत दिली. 

उत्तर प्रदेशमध्ये २०२३ मध्ये २३ हजार ६५२ नागरिकांचा मृत्यू हा रस्ते अपघात झाला. 

तर तामिळनाडूमध्ये २०२३ मध्ये रस्ते अपघात १८३४७ नागरिकांचा मृत्यू झाला. 

महाराष्ट्रात रस्ते अपघातात २०२३ मध्ये १५३६६ नागरिकांचा मृत्यू झाला. 

मध्य प्रदेशमध्ये २०२३ मध्ये १३७९८ नागरिकांचा तर कर्नाटकमध्ये १२३२१ नागरिकांचा मृत्यू झाला. 

दिल्लीमध्ये १४५७ तर बेंगळुरूमध्ये ९००, जयपूरमध्ये ८४९, आणि कानपूरमध्ये ६३८ नागरिकांचा साल २०२३ मध्ये रस्ते अपघात मृत्यू झाला. 

भारतात होणाऱ्या रस्ते अपघातावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय समनेलंनात जावे लागते तेव्हा तोंड लपवण्याची वेळ येत असल्याचे गडकरी म्हणाले.  

लाईमलाईटपासून दूर राहतात 'या' बॉलिवूड वाईफ्स!