रिपब्लिक डे निमित्त होणारा संचलन सोहळा पाहण्यासाठी देशभरातूनच नाही देत परदेशातून देखील नागरिक येत असतात. या परेडमध्ये लष्करी जवान व सशस्त्र दलातील जवान कर्तव्य पथावर मार्च करतात व राष्ट्रपतीसह तिरंग्याला सलामी देतात.
कर्तव्य पथावर होणाऱ्ऱ्या या संचलन सोहळ्यातून देशाच्या लष्कराच्या गौरव गाथेच आणि देशाच्या लष्करी शक्तिच प्रदर्शन होतं.
परेडमध्ये सहभागी होणाऱ्या जवानांच्या हाती बंदुका देखील असतात. तुम्ही कधी विचार केला आहे का ? की या बंदुकांमध्ये खरचं गोळ्या असतात की त्या रिकाम्या असतात.
रिपब्लिक डे निमित्त आयोजित परेडमध्ये भारतीय लष्कर, वायुसेना आणि नौसेनेच्या जवानांसह निमिलष्करी दलाच्या जवानांच्या तुकड्या देखील सहभागी होत असतात.
परेडमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक जवानाच्या हाती एक घातक बंदूक असते. सलामी देतांना या बंदुकांचा देखील वापर केला जातो.
रिपब्लिकडे निमित्त आयोजित परेडमध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, तिन्ही दलाचे प्रमुख, परदेशी पाहुणे यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित राहतात.
परेडमध्ये सहभागी होणाऱ्या नगरिकांच्या सुरक्षा महत्वाची असते. त्यामुळे प्रत्येक बाबींचे बारकाई नियोजन केलं जातं. ज्यामुळे परेड ग्राॉऊंडवर कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये.
त्यामुळे या परेडमध्ये सहभागी होणाऱ्या जवानांच्या बंदुका या रिकाम्या असतात. त्यात बुलेट देखील नसतात.
जर बंदुकांमध्ये गोळ्या (बुलेट) असतील तर त्यामुळे परेड दरम्यान कुणी जखमी वा मोठा अपघात होण्याची शक्यता असते. या गोळ्या परेडमध्ये सहभागी नागरिकांना लागू शकतात.
परेडमध्ये वापरल्या जाणाऱ्या बंदुकांसाठी विशेष प्रकारच्या गोळ्या तयार केल्या जातात. ज्यामुळे फक्त आवाज निघतो.