इस्लाम धर्मात रमजान महिना हा सर्वात पवित्र मानला जातो. मुस्लिम धर्माचे लोक या संपूर्ण महिन्यात उपवास ठेवतात आणि सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काहीही सेवन करत नाहीत.
भारतात १२ मार्चपासून रमजान महिना सुरू होणार आहे. तसेच या दिवशी पहिला उपवास केला जाणार आहे.
रमजानचा उपवास २९ किंवा ३० दिवसांचा असतो. इस्लाम धर्मात असे म्हटले जाते की रमजानमध्ये उपवास केल्याने अल्लाह प्रसन्न होतो आणि सर्व प्रार्थना स्वीकारतो.
रमजानमध्ये उपवास करताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. उपवास करण्यापूर्वी सेहरी करणे आवश्यक आहे. रमजान महिन्यात दररोज सूर्योदयापूर्वी अन्न खाल्ले जाते. याला सेहरी म्हणतात.
उपवास सोडताना देखील आपल्या आहाराची काळजी घेणे आवश्यक आहे. चहा किंवा कॉफी पिणे टाळावे. लिंबू पाणी किंवा नारळ पाणी चांगला पर्याय असू शकतो.
रोजा दरम्यान, लोक सकाळी जास्त तेलकट आणि साखरयुक्त अन्न खातात. ते शरीराला हानी पोहोचवू शकते. यामुळे रोजा पाळताना जास्त गोड पदार्थ, तेलकट, हार्ड ड्रिंक्स आणि फास्ट फूड खाणे टाळणे गरजेचे आहे.
हिरव्या भाज्यांचे सेवन फायदेशीर आहे. यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत शरीरात ऊर्जा टिकून राहते. सोबतच यात जास्त कॅलरीज नसतात.
रमजानचा उपवास सोडताना मसूर, बीन्स, लीन मीट, मासे, दुधाचे पदार्थ आणि अंडी यांचा समावेश करावा.