तुळशीची माळ गळ्यात घालण्यापूर्वी ‘हे’ ७ नियम ठेवा लक्षात!

By Harshada Bhirvandekar
Jun 15, 2024

Hindustan Times
Marathi

तुळशीची माळ हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानले जाते.  

गळ्यात तुळशीची माळ धारण केल्याने अनेक फायदे होतात. तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो, असे मानले जाते. 

या माळेने भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करणे फलदायी मानले जाते. तुळशीची माळ घालण्याचे काही महत्त्वाचे नियम देखील सांगितले आहे ते जाणून घेऊया...  

एकदा तुळशीची माळ गळ्यात घातली की, ती पुन्हा पुन्हा गळ्यातून काढू नये.  

तुळशीची माळ धारण करणाऱ्याने नेहमी सात्विक भोजनच करावे.  

परिधान करण्यासाठी आणि जप करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुळशीच्या जपमाळा या वेगवेगळ्या असाव्यात.

ज्याने तुळशीची जपमाळ धारण केली आहे, त्याने रुद्राक्षाची जपमाळ धारण करू नये.  

दुसऱ्याची तुळशी माळ आपल्या गळ्यात घालणे, शास्त्रात निषिद्ध मानले गेले आहे.  

तुळशीची माळ कधीही ओलांडणे टाळावे. तुळशीची माळ घातल्यास दररोज भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी.

ही फळं त्वचेला देतात चमक

Pexels