२०००मध्ये प्रसारित झालेला ‘शाका लाका बूम बूम’ हा टीव्ही शो आजही लोकांना आठवतो. त्यात झळकलेल्या बालकलाकारांनी सगळ्यांची मनं जिंकून घेतली होती.
२४ वर्षानंतरही या बालकलाकारांबद्दल जाणून घेण्यात चाहत्यांना भरपूर रस आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकलेला ‘संजू’ सध्या काय करतो? बघा...
‘संजू’ची भूमिका अभिनेता किंशुक वैद्य याने साकारली होती. या भूमिकेतून त्याला घरोघरी ओळख मिळाली. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा तो लाडका बनला होता.
संजूची मॅजिकल पेन्सिलच नाही, तर त्याचा हेअर कटही त्यावेळी हिट झाला होता. आजही बहुतेक लोक किंशुकला ‘संजू’ या नावानेच ओळखतात.
चोवीस वर्षानंतर आता किंशुक वैद्य पूर्णपणे बदलला आहे. तो पूर्वीपेक्षा अधिक राजबिंडा दिसतो. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे.
किंशुक वैद्य सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांना आपल्या आयुष्याच्या अपडेट्स देत असतो.
किंशुक फिटनेसफ्रिक आहे. तो त्याचे जिममधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो.
‘शाका लाका बूम बूम’नंतरही किंशुक वैद्य हा अनेक टीव्ही शोमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकला आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान