मार्केटसारखा स्पंजी ढोकळा बनवण्याची रेसिपी!

By Aiman Jahangir Desai
Dec 21, 2024

Hindustan Times
Marathi

ढोकळा हा गुजरातमधील प्रसिद्ध पदार्थ आहे. ज्याला सध्या भारतभर पसंती मिळत आहे. अगदी कमी तेलात बनवलेल्या पदार्थांपैकी हा एक पदार्थ आहे.

साहित्य-बेसन,रवा,लिंबाचा रस,इनो पावडर,हिरवी मिरची,आले, पाणी,दही, तेल, मीठ, 

फोडणी- तेल, कढीपत्ता, मोहरी,जिरे,तीळ,साखर,हिरवी मिरची,किसलेले ताजे नारळ ,हिंग,पाणी 

खमण ढोकळा तयार करण्यासाठी प्रथम भांड्यात २ ते ३ कप पाणी घाला. मध्यम  गॅसवर गरम करा. प्लेट ठेवण्यापूर्वी ढोकळा बनवण्यासाठीचे भांडे किमान ५ मिनिटे गरम करावे.

आता २ लहान प्लेट्स घ्या. २ चमचे तेल लावा आणि पुसून घ्या. 

आता एका मोठ्या भांड्यात बेसन, रवा, लिंबाचा रस, हिरवी मिरची-आले पेस्ट, दही आणि 3/4 पाणी एकत्र करा. त्यात चवीनुसार मीठ घाला. आता ते चांगले मिसळा. अशा प्रकारे मिसळा की मिश्रणात गुठळ्या शिल्लक राहणार नाहीत.

आता या द्रावणात इनो पावडर घाला आणि एक मिनिट फेटून घ्या, यामुळे मिश्रण जवळजवळ दुप्पट होईल.

यानंतर लगेचप्लेटमध्ये मिश्रण ओता. पीठ ओतताना लक्षात ठेवा की ताट फक्त १/२ इंच उंचीपर्यंतच पिठात भरलेले असावे.

आता ढोकळा बनवण्यासाठी भांड्यात एक स्टँड ठेवा, नंतर त्यावर एक प्लेट ठेवा आणि वाफेच्या मदतीने मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटे शिजू द्या.

स्मृती मानधनानं किती शतकं ठोकली?