रवींद्र जडेजाची भाजपमध्ये एन्ट्री

By Rohit Bibhishan Jetnavare
Sep 05, 2024

Hindustan Times
Marathi

टीम इंडियाचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याने नुकतीच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. 

आता जडेजाने नवी इनिंग सुरू केली आहे. तो आता भारतीय जनता पक्षाचा सदस्य झाला आहे. 

जामनगरची आमदार आणि जडेजाची पत्नी रिवाबाने सोशल मीडियावर ही माहिती दिली.

रवींद्र जडेजा अनेकवेळा पत्नी रिवाबासोबत प्रचार करताना दिसला आहे. आता त्याने अधिकृतरित्या भाजपचे सदस्यत्व घेतले आहे.

जड्डूने टी-20 वर्ल्डकपनंतर कोणताही सामना खेळलेला नाही. तो बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत दिसू शकतो.

टी-20 वर्ल्डकपनंतर त्याने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. तो आता केवळ टेस्ट आणि वनडे खेळेल.

जडेजाने टीम इंडियासाठी ७४ टी-20 मध्ये ५१५ धावा केल्या आणि ५४ विकेट्स घेतल्या आहेत.

जडेजाने आतापर्यंत १९७ वनडे खेळले असून १३२ डावात १३ अर्धशतकांसह २७५६ धावा केल्या. आणि २२० विकेट्स घेतले आहेत.

जड्डूने ७२ कसोटी सामन्यात ३०३६ धावा केल्या. सोबतच २९४ विकेट्स घेतल्या. जडेजाने कसोटीत ५ शतकं आणि २० अर्धशतकं केली.  

सर्वाधिक वेळा बोनस शेअर देणाऱ्या कंपन्या कोणत्या?