आर अश्विन आहे तब्बल 'इतक्या' कोटींचा मालक!

By Ashwjeet Rajendra Jagtap
Dec 18, 2024

Hindustan Times
Marathi

भारताचा आघाडीचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

अश्विनने सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर मालिकेदरम्यानच निवृत्तीची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला.

अश्विनची एकूण संपत्ती किती आहे आणि तो क्रिकेटमधून किती कमाई करतो? याबद्दल जाणून घेऊयात.

रविचंद्रन अश्विनची २०२४ मध्ये एकूण संपत्ती १३२ कोटी रुपये आहे.

याशिवाय, अश्विन ​​अनेक मोठ्या ब्रँड्ससाठी जाहिराती करतो, ज्यातून तो तगडी कमाई करतो.

बीसीसीआयकडून अश्विनला वार्षिक ५ कोटी रुपये वेतन मिळायचे.

अश्विनने २०२१ मध्ये चेन्नईमध्ये एक आलिशान बंगला खरेदी केला, ज्याची किंमत जवळपास ९ कोटी रुपये आहे. 

अश्विनकडे रॉल्स रॉइस आणि ऑडी क्यू७ कार आहे, ज्याची किंमत अनुक्रमे ६ कोटी आणि ९३ रुपये आहे.

क्रिकेटच्या मैदानाबाहेर अश्विनने ब्रँड एंडोर्समेंट्समधून भरपूर कमाई केली.

याशिवाय, तो जेन नेक्स्ट क्रिकेट अकॅडमीमध्ये युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करतो आणि त्याची स्वत:ची कंपनी आहे.

सैफ अली खान डिस्चार्जनंतर फिट अँड फाईन, नवाबासारखी एंट्री