रथसप्तमीला सूर्याला अर्घ्य देतांना या गोष्टी लक्षात ठेवा!
By
Priyanka Chetan Mali
Feb 03, 2025
Hindustan Times
Marathi
मंगळवार ४ फेब्रुवारी रोजी, रथसप्तमी आहे. या तिथीला सूर्योदयाआधी उठून आंघोळ करावी आणि सूर्याची पूजा करावी अशी परंपरा आहे.
मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने आपला पुत्र सांबलाही हे व्रत आणि सूर्य पूजा करण्यास सांगितले होते.
यामुळे सांबचा आजार बरा झाला होता. यादिवशी रथावर बसलेल्या सूर्याची पूजा करतात त्यामुळे याला रथसप्तमी म्हणतात.
जाणून घेऊया रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देतांना कोणत्या गोष्टि लक्षात ठेवाव्या ते.
रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदय होण्याआधीच पवित्र नदीत स्नान करावे.
नदीत स्नान करताना बोक किंवा मदार (रुई)ची सात-सात पाने डोक्यावर ठेवावी.
त्यानंतर सात-सात बोर आणि मदारची पाने, तांदूळ, तीळ, दूर्वा, चंदन मिसळून सूर्याला अर्घ्य द्यावे.
शेवटी सप्तमी देवीला नमस्कार करत सूर्यालाही नमस्कार करावा.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
केस गळती थांबेना? मग हे एकदा करून पाहा!
पुढील स्टोरी क्लिक करा