रश्मिका मंदानाची ‘बॉयफ्रेंड’सोबत परदेशवारी!

By Harshada Bhirvandekar
Jan 16, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून हे दोघे लवकरच साखरपुडा करणार असल्याचे म्हटले जात आहे.

या डेटिंग आणि साखरपुड्याच्या चर्चांदरम्यान आता हे लव्हबर्ड्स एकत्र सुट्ट्या एन्जॉय करत आहेत.

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा दोघांनी एकत्र व्हिएतनाम ट्रीप केली आहे.

या ट्रीपमध्ये दोघांनी खूप धम्माल मस्ती केली आहे, याची झलक नुकतीच बघायला मिळाली आहे.

रश्मिका आणि विजय यांनी एकत्र फोटो शेअर केले नसले तरी त्यांनी शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चा सुरू झाली आहे.

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. 

दोघेही या फोटोंमध्ये आपली ट्रीप एन्जॉय करताना दिसले आहेत.

बोल्ड ब्लॅक ड्रेसमध्ये सुरभीच्या सुपर हॉट अदा, वाढवला पारा!

Instagram