विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या नात्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून जोरदार रंगत आहेत.
दोघांनी गुपचूप साखरपुडा केल्याची बातमी देखील समोर आली होती. तर, आता दोघे लवकरच लग्न करणार आहेत, असं देखील म्हटलं जात आहे.
रश्मिका आणि विजय यांची जोडी मोठ्या पडद्यावर चांगलीच पसंत केली गेली. दोघांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.
दोघांच्या अफेअरच्या बातम्या पहिल्या चित्रपटापासूनच चर्चेत होत्या. मात्र, त्या दोघांनीही याबाबतीत नेहमीच मौन बाळगले.
रश्मिका आणि विजय यांनी ‘गीता गोविंदम’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्या सेटवरच त्यांची पहिली भेट झाली, हळूहळू मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले, असं बोललं जातं.
‘गीता गोविंदम’नंतर विजय आणि रश्मिका यांनी ‘डियर कॉम्रेड’ या चित्रपटात एकत्र काम केलं. या चित्रपटातील त्यांच्या जोडीला तुफान लोकप्रियता मिळाली.
सोशल मीडियावर विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचे एकत्र अनेक फोटो व्हायरल होत असतात.
अभिनेता विजय देवरकोंडा हा त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त असून, लवकरच त्याचा ‘फॅमिली स्टार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रश्मिका देखील तिच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात रश्मिका अल्लू अर्जुनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रेया बुगडे पोहोचली वर्षा बंगल्यावर