रणजी चॅम्पियन मुंबईवर पैशांचा पाऊस

ANI

By Rohit Bibhishan Jetnavare
Mar 14, 2024

Hindustan Times
Marathi

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रणजी ट्रॉफी २०२३-२४ चे विजेतेपद पटकावले. फायनलमध्ये मुंबईने विदर्भाचा १६९ धावांनी पराभव केला. 

मुशीर खान, शार्दुल ठाकूर आणि श्रेयस अय्यर यांनी मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कर्णधार अजिंक्य रहाणेनेही चांगली कामगिरी केली. 

रणजी ट्रॉफी जिंकल्यानंतर मुंबईला बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळाली आहे. विदर्भानेही चांगली कमाई केली आहे.

मुंबईला बक्षीस म्हणून ५ कोटी रुपये मिळाले आहेत.  सामनावीर मुशीर खानला ५० लाखांचे बक्षीस मिळाले आहे.

ANI

मुंबईने पहिल्या डावात २२४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांवर गारद झाला. त्यानंतर मुंबईने दुसऱ्या डावात ४१८ धावा केल्या.

अशाप्रकारे मुंबईने विदर्भाला ५३८ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात विदर्भ ३६८ धावांवर सर्वबाद झाला आणि १६९ धावांनी सामना गमावला.

विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने दुसऱ्या डावात १९९ चेंडूत १०२ धावा केल्या.पण  तो त्यांच्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. 

ANI

टॉपलेस होऊन तृप्ती डिमरीने लावली इंटरनेटवर आग!