हनीमूनदरम्यान पत्नीसोबत रोमँटिक झाला रणदीप, मात्र का झाला ट्रोल?

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Jan 01, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा २९ नोव्हेंबर २०२३ रोजी गर्लफ्रेंड लिन लॅशरामसोबत विवाहबद्ध झाला होता.

लग्नाच्या एक महिन्यानंतरर रणदीप पत्नी लिन सोबत केरळमध्ये हनीमून एन्जॉय करत आहे. 

रणदीपने पत्नीसोबत केरळच्या निसर्गरम्य ठिकाणी नववर्षाचे स्वागत केले.

रणदीपने हनीमूनचे रोमंटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

हनीमूनच्या फोटोंमध्ये नवविवाहित जोडपे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहे. 

रणदीपने शेअर केलेल्या एका फोटोत लिनने काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केल्याचे दिसत आहे. रणदीपने आपल्या लेडी लव्हसोबतच सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद केले आहेत.

रणदीप व लिनच्या फोटोंवर फॅन्सकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. एका युजरने लिहिले ऑसम कपल..

दरम्यान रणदीपच्या पत्नीला मोनोकिनीत पाहून एका युजरने लिहिले आहे की, विवाह तर धार्मिक विधी व संस्कारात केला होता. तर आता काय झाले. 

अन्य एकाने लिहिले आहे, तुमच्याकडे अशी अपेक्षा नव्हती. दरम्यान अनेकांनी त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

टोमॅटो खाण्यापूर्वी ही गोष्ट जाणून घ्या!

pixa bay