राहुल द्रविडची एकूण संपत्ती किती?
By
Rohit Bibhishan Jetnavare
Jan 11, 2025
Hindustan Times
Marathi
टीम इंडियाचा माजी हेड कोच राहुल द्रविड याचा आज ५२वा वाढदिवस आहे.
द्रविडचा जन्म ११ जानेवारी १९७३ साली इंदूरमध्ये झाला. द्रविडने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २४००० हून अधिक धावा केल्या.
कोचिंगच्या माध्यमातून त्याने २०२४ मध्ये भारताला टी-20 विश्वचषक जिंकून दिला.
भारतातील श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत द्रविडचा समावेश होतो. त्याची एकूण संपत्ती ३२० कोटी रुपये आहे.
द्रविडने त्याच्या कारकिर्दीत अनेक ब्रँड एंडोर्समेंट केले आहेत आणि ब्रँड डील्सद्वारे भरपूर कमाई केली आहे.
द्रविडने रिबॉक, पेप्सी, किसान, कॅस्ट्रॉल या ब्रँड्ससोबत काम केले आहे.
द्रविडचे बंगळुरूमध्ये आलिशान घर आहे. त्याच्या घराची किंमत करोडोंमध्ये आहे. तर द्रविडकडे मर्सिडीज बेंझ, पोर्श सारख्या महागड्या कार आहेत.
राहुल द्रविडने ३ एप्रिल १९९६ रोजी सिंगापूर येथे श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून पदार्पण केले.
द्रविडने १६४ कसोटी, ३४४ वडने आणि एक T20 सामना खेळला आहे.
तिन्ही फॉरमॅटमध्ये २४२०८ धावा केल्या. त्याने कसोटीत १३२८८ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ४८ शतके आहेत.
रोज मिरची खाण्याचे ७ आरोग्यदायी फायदे
Pinterest
पुढील स्टोरी क्लिक करा