‘या’ मुलांकाचा स्वामी आहे राहू; नशिबात आणेल भरभराट!

By Harshada Bhirvandekar
Jul 07, 2024

Hindustan Times
Marathi

अंकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीचा मुलांक त्याच्या जन्मतारखेवरून कळू शकतो. 

मुलांकाच्या आधारे त्या व्यक्तीच्या आयुष्याशी संबंधित अनेक अंदाज बांधता येतात. 

अंकशास्त्राचा आधारे जाणून घ्या कोणत्या संख्येचा स्वामी राहू आहे आणि अशा लोकांचे जीवन कसे असू शकते?

अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा मुलांक ४ आहे, त्यांच्यावर राहूचा विशेष प्रभाव असतो. या मुलांकाचा अधिपती ग्रह राहू आहे. 

अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक ४ असतो.

राहूच्या प्रभावामुळे मुलांक चारच्या लोकांच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडू शकता, ज्या सर्वांना आश्चर्यचकित करतात.  

त्यांच्या हातून अशी कामे होतात ज्याची कुणालाही अपेक्षा नसते. मुलांक चार असलेले लोक इतरांवर सहज प्रभाव टाकतात.

अंकशास्त्रानुसार, ४ मुलांक असणारे लोक आपल्या मित्रांसाठी काहीही करण्यास तयार असतात.

पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी