राहू शांतीचे उपाय

By Rohit Bibhishan Jetnavare
Mar 08, 2024

Hindustan Times
Marathi

ज्योतिष शास्त्रानुसार राहू हा पीडा देणारा ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि केतूचे दोष असतात त्या व्यक्तीचे जीवन नरकासारखे होते, अशी मान्यता आहे. 

अशा परिस्थितीत माणूस जे काही काम करतो, त्यात यश मिळण्याची शक्यता फारच कमी असते. यामुळेच राहुच्या अशुभ प्रभावाने लोक भयभीत होतात.

त्यामुळे राहू ग्रहाला शांत ठेवणे महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया राहू शांतीसाठी काही उपाय.

१) राहुला शांत करण्यासाठी शनिवारी व्रत ठेवा आणि पूजेत निळ्या फुलांचा वापर करा. महादेवाची नित्य उपासना करा. महादेवाचा रुद्राभिषेक करा, फायदा होईल.

२) रत्न शास्त्रानुसार राहूचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी त्याचे शुभ रत्न गोमेद धारण करा. शनिवारी ते मधल्या बोटात घाला. ज्योतिष तज्ज्ञही हे योग्य मानतात. हा उपाय केल्याने राहू दोष दूर होतो.

३) राहूला शांत करण्यासाठी तुम्ही त्याचा बीज मंत्र किंवा वैदिक मंत्र जपला पाहिजे. कलियुगात राहू मंत्राचा ७२ हजार वेळा जप करावा.  

राहू बीज मंत्र: ओम रा रहवे नम: राहू तांत्रिक मंत्र: ओम ह्रीं राहवे नम: राहू वैदिक मंत्र: ओम कायनाश्चित्र अभुवदुति सदावृद्ध: सखा। कायश्चिष्ठयवृता ।  

४) शनिवारी रात्री शिसे, काळे तीळ, सप्तधन, मोहरीचे तेल, घोंगडी, उडीद, काळे कापड, लोखंड, गोमेद, सोने, सूप, काळे फूल इत्यादी दान करा. या वस्तूंचे दान केल्याने राहू दोषही दूर होतो.

५) राहूचा गडद प्रभाव टाळण्यासाठी देवतांची पूजा करणे हा एक चांगला मार्ग आहे. देवी भगवतीची पूजा केल्याने राहूचे अशुभ प्रभाव दूर होतात. दुर्गा मातेची उपासना केल्याने राहू ग्रहाचा अशुभ प्रभाव शांत होतो.

आयपीएल २०२४ मधील सुपरफास्ट शतक!